सातारा : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्याचे नाव आता शंभर वर्षे आपल्या आयुर्वेदिक औषधांनी जगभर पोहोचवणाऱ्या आयुर्वेदिय अर्कशाळा संस्थेचा आपणा सर्वांना अभिमान आहे, आणि खऱ्या अर्थाने केवळ औषधच नव्हे तर कौटुंबिक परंपरा जपत दर्जेदार गुणवत्ता राखणाऱ्या अर्कशाळा परिवाराचे नाव असेच वृद्धिंगत होवो, अशा शब्दात ज्येष्ठ चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी गौरवोद्गार काढले.
सातारा येथील आयुर्वेदिय अर्कशाळा लि. या संस्थेच्या सदिच्छा भेटी प्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी संस्थेचे संचालक डाॅ.अच्युत गोडबोले ,संस्थेचे लेखा परीक्षक प्रसन्न गोखले यांचे सह संस्थेचे संचालक डॉ. अच्युत गोडबोले, प्रसन्न गोखले सर,मॅनेजर एरंडे साहेब, समन्वयक योगेश देशपांडे, उत्पादन प्रमुख सतीश देशपांडे, सुपरव्हायझर गोखले,कामगार प्रतिनिधी प्रशांत मोरे, वसंत तिखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अर्कशाळेविषयी माहिती देताना ज्येष्ठ संचालक विश्वस्त डाॅ. अच्युत गोडबोले म्हणाले की शंभर वर्षांपूर्वी 1925 सालात वैद्य आगाशे, दिक्षित यांच्यासारख्या ज्येष्ठ धन्वंतरींनी या औषधाचे फॉर्मुले तयार केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था प्रारंभीच्या काळात घरगुती स्वरूपात सुरू झाली मात्र या संस्थेचा कार्य विस्तार होत गेला, आपल्या उत्कृष्ट प्रतीच्या गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार आयुर्वेदिक औषध उत्पादनाने वृद्धिंगत होत गेली त्यांच्या फॉर्मुल्यानुसारच आजही संस्था अशी दर्जेदार औषधे बनवत असून त्याला संपूर्ण देशातून मोठी मागणी आहे. अर्क शाळेची सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह हैदराबाद, हुबळी येथे एकूण आठ विशेष विक्री केंद्र असून सध्या अर्थशाळेतर्फे निरामय दवाखाना दररोज अर्कशाळा नगर येथे चालविण्यात येतो. संस्थेची सध्या 125 उत्पादने असून अकरा कोटीचा वार्षिक उलाढालीचा व्यवहार करणाऱ्या या संस्थेत सध्या 140 कामगार, कर्मचारी, डेपो मॅनेजर काम करत असून दीडशे कुटुंबांचा रोजगार या संस्थेमार्फत उपलब्ध करण्यात आले आहे.
या कारखान्यांमध्ये महिलांना विशेष प्राधान्य असून महिला कर्मचाऱ्यांकडून ही उत्कृष्ट दर्जाची गुणवत्ता पूर्ण औषधे पॅकिंग तसेच बनवण्यासाठी मदत घेतली जाते. या उत्पादनांच्या निर्मितीस निर्मितीसाठी लागणारे उपपदार्थ हे संपूर्ण देशातून विशेष करून मुंबई, दिल्ली, छत्तीसगड येथून तसेच कर्नाटक, महाराष्ट्रातूनही खरेदी करून कोणतीही तडजोड न करता गुणवत्ता पूर्ण औषधे बनवण्यासाठी अर्थशाळा हे नाव सर्वात लोकप्रिय असे आहे.
जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी अर्क शाळेच्या परिवारासोबत आपल्या सदिच्छा भेटीत विविध औषध विभाग तसेच पॅकिंग विभाग या विभागांना भेट देऊन कार्याची प्रशंसा करताना अर्कशाळा हे साताऱ्याशी जोडले गेलेले नाव आज शंभर वर्षांची वाटचाल पूर्ण करताना विशेष आनंद होतो. केवळ राज्यातच नव्हे तर देशात आणि परदेशातही आयुर्वेदिक औषधे नेऊन आयुर्वेदाचा प्रसार करण्याचे काम या संस्थेने केले आहे, याचा मोठा अभिमान वाटतो अशा शब्दात सयाजी शिंदे यांनी संस्थेचे कौतुक केले. याप्रसंगी अर्कशाळेच्या वतीने अच्युत गोडबोले यांनी सयाजी शिंदे यांचा आयुर्वेदिक औषधाचे किट देऊन सत्कार केला. विनायक गोखले यांनी विविध विभागाची माहिती सयाजी शिंदे यांना दिली.
याप्रसंगी सयाजी शिंदे यांचे सोबत अभय फडतरे तसेच कु. फडतरे उपस्थित होत्या सदिच्छा भेटी प्रसंगी अर्थशाळेच्या आवारात सयाजी शिंदे यांचे हस्ते शेवगा वृक्षाची लागवड करण्यात आली. आपल्या परंपरेमध्ये देवराई ही संकल्पना लुप्त होत चालली असताना, आम्ही यासाठी विशेष प्रयत्नशील असून विविध ठिकाणी शंभरहून अधिक देवराया विकसित करण्याचा संकल्प केला असून, राज्यात 500 हून अधिक देवराया ज्या नामशेष होत आहेत. त्या पुनर्जीवित करण्याचा वसा आम्ही घेतल्याचे यावेळी उपस्थित आंपुढे बोलताना सयाजी शिंदे यांनी सांगितले. अर्क शाळेचे व्यवस्थापक यांनी आभार प्रदर्शन केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांची ओळख योगेश देशपांडे यांनी करून दिली.