सातारा : रेल्वे स्टेशन परिसरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रेल्वे स्टेशन परिसरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला. त्याचे वय अंदाजे 35 असून अंगात पांढऱ्या रंगाचा चौकडा शर्ट व निळ्या रंगाचा बर्मूडा घातलेला आहे. कमरेला काळ्या रंगाचा करदोडा असून डाव्या हातात लाल रंगाचा दोरा आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सावंजी करीत आहेत.