मुलीवर केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी केलेल्या खूनप्रकरणी एकाच कुटूंबातील चौघांना अटक; काहीही धागेदोरे गुन्हा उघडकीस आणला

by Team Satara Today | published on : 02 March 2026


फलटण  : मुलीवर केलेल्या अत्याचाराचा  बदला घेण्यासाठी खुन करणाऱ्या एकाच कुटूंबातील चौघांना  फलटण ग्रामीण पोलिसानी अटक केली आहे.

दि. 17/02/2026 रोजी सायंकाळी 6  वाजनेच्या सुमारास गोखळी, ता. फलटण गावच्या हद्दीत नीरा नदीच्या पात्रात एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत पाण्यावर तरंगत असलेल्या स्थितीत ग्रामस्थांना दिसून आले होते. त्याचा तपास  करताना अनोळखी मृतदेहाची ओळख पटुन ते अंकुश बापू नरबट (वय  22 वर्ष, रा. ढाकणी, ता. माण)  याचे असल्याचे निष्पन्न झाले.

तो माण तालुक्यातील रहिवाशी असताना त्याचा मृतदेह फलटण तालुक्यातील नीरा नदीच्या पात्रात कसा मिळुन आला ? याशिवाय प्रेताचे डोक्यावर असणा-या जखमा कशा ? ही शंका पोलीसांना आली. त्यातच मृत हा स्त्रीलंपट असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस तांत्रिक व गोपनीय माहितीच्या

आधारे मुळापर्यंत गेल्यानंतर असे निष्पन्न झाले, की मृत अंकुश बापू नरबट याने आरोपींच्या कुटूंबातील एका मुलीबाबत अत्याचाराचा प्रकार केला होता. परंतु आरोपींनी खोट्या प्रतिष्ठेपायी त्याची कोठेही वाच्यता न करता बदला घेण्यासाठी त्याचा खुन करण्याचा कट केला. 

मृतास प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी स्त्रीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट उघडुन मृत व्यक्तीस प्रेमाच्या जाळ्यात ओढुन फलटणला भेटायला बोलाविले. दि. 15/02/2025 रोजी 12वाजण्याच्या सुमारास अंकुश नरबट हा फलटणला आल्यानंतर आरोपींपैकी एका महिलेने त्यास एकांतात वेळ घालविण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळ असलेल्या तातमगिरी डोंगराच्या पायथ्याला नेले.

त्याठिकाणी गेल्यानंतर कटानुसार आविष्कार ज्ञानेश्वर भगत, श्रद्धा आविष्कार भगत, ज्ञानेश्वर भरतराव भगत, अर्चना ज्ञानेश्वर

भगत (चौघे रा. पिंप्रद, ता. फलटण) हे  चार आरोपी हे वेगवेगळ्या वाहनातून गेले. तेथे त्यांनी मृत अंकुश नरबट यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन चारचाकी वाहनामध्ये घालुन पिंप्रद गावचे हद्दीत दुस-या निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी त्याचा खून  करुन त्याचे प्रेत पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने गोखळी गावचे हद्दीत निरानदीच्या पात्रात टाकुन दिले. 

हा प्रकार निष्पन्न झाल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीसनी खुनाचा गुन्हा नोंद केला . त्याचा तपास पो. उ. नि. दीपक पवार हे करीत आहेत. आरोपी आविष्कार ज्ञानेश्वर भगत,श्रद्धा आविष्कार भगत,ज्ञानेश्वर भरतराव भगत, अर्चना ज्ञानेश्वर भगत चौघे रा. पिंप्रद, ता. फलटण, जि. सातारा यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींनी सदरचा गुन्हा थंड डोक्याने कट करुन केला आहे. यामुळे तपासामध्ये सुरुवातीला पोलीसांकडे काहीही धागेदोरे नव्हते. परंतु पोलीसांनी अत्यंत मेहनतीने फलटण ते दहिवडी रोडवरील सर्व हॉटेल, दुधडेअरी व पेट्रोलपंप इत्यादी ठिकाणांवरील सी. सी. टी. व्ही. कॅमेरे तपासले. आरोपी व मृतक यांचे मोबाईल नंबरची तांत्रिक माहिती प्राप्त केली. त्यातून मिळालेल्या तुटपुंज्या माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करुन पुराव्याची साखळी जोडुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदर कार्यवाहीत पोलीस अधीक्षक  तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांचे नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक ज्ञानदेव पवार, पोलीस अमंलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सुर्यवंशी, हणमंत दडस यांनी सहभाग घेतला. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेखर चरेगावकर यांची कोठडी वाढली; कराड न्यायालयाने दिली सहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी; सातारा आर्थिक गुन्हे शाखेचे गुंतवणूकदारांना आवाहन
पुढील बातमी
विना नंबर प्लेट व मोठ्या आवाजाच्या बुलेटला पंचावन्न हजार रुपये दंड, फलटणमध्ये मोहीम कडक

संबंधित बातम्या