09:06pm | Apr 11, 2024 |
सातारा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांना मान देणारा सातारा जिल्हा आहे. मतदार राजाच्या मनात जे आहे, ते उत्स्फूर्तपणे पाहायला मिळत आहे. यशवंत विचारांचा हा जिल्हा पुरोगामी विचाराची परंपरा कायम ठेवून पुन्हा इतिहास घडवेल, अशी प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित केले आहे. शिंदे यांचे नाव जाहीर होताच राष्ट्रवादीच्या गोटात चैतन्य पसरले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांचे शुक्रवारी दुपारी बाराच्या दरम्यान सारोळा पुलावरून सातारा जिल्ह्याच्या हद्दीत आगमन झाले. राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने तसेच विविध पदाधिकारी त्यांच्या स्वागताला हजर होते. शेकडो कार्यकर्त्यांनी शशिकांत शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा दिल्या. यानिमित्ताने राष्ट्रवादीचे जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले.
यावेळी प्रतिक्रिया देताना शशिकांत शिंदे म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकर विचारांची सातारा जिल्ह्याने सातत्याने पाठराखण केली आहे. पवार साहेबांनी यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली आहे. सातार्यात प्रवेश होत असताना तरुण मतदारांचा असणारा उत्साह या निमित्ताने पाहायला मिळत आहे. यशवंत विचारांचा हा जिल्हा पुन्हा एकदा पुरोगामी विचाराची परंपरा कायम ठेवून इतिहास घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा आणि वाहने सातार्याच्या दिशेने रवाना झाली. कवठे, बोपेगाव, जोशी विहीर, भुईंज, पाचवड फाटा, आनेवाडी व बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे आमदार शशिकांत शिंदे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या या अलोट प्रेमामुळे आपण भारावून गेल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
येत्या पंधरा तारखेला शशिकांत शिंदे शरद पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीच्या या शक्ती प्रदर्शनामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |