टायर चोरट्यास लोणंद पोलिसांकडून अटक

टमटमसह पावणेतीन लाखांचा मुद्देमालही हस्तगत

by Team Satara Today | published on : 13 February 2025


सातारा : चारचाकी गाडीचे डिस्क व टायर आदी मुद्देमाल टमटममध्ये भरून चोरून चाललेल्या एका संशयितास लोणंद पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरून चाललेला पावणेतीन लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास रात्रगस्तीत येथील शास्त्री चौकात ही कारवाई केली.

रोहित ओमप्रकाश विश्वकर्मा (वय २३, रा. लोणंद, ता. खंडाळा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले व त्यांचे सहकारी रात्रगस्त घालत असताना काल पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येथील शास्त्री चौकात एक संशयित टमटमच्या (एमएच ११ सीएच ४६२८) पाठीमागील हौद्यामध्ये नवीन टायर भरून जाताना दिसला. पोलिसांनी पाठलाग करून टमटम थांबवली असता चालक रोहित विश्वकर्मा हा त्यामध्ये मिळून आला.

त्यावेळी त्यास गाडीमध्ये असलेले टायर याबाबत माहिती विचारली असता त्याने असमाधानकारक माहिती देऊन उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या ताब्यातील टमटममध्ये दोन लाख ३० हजार रुपये किमतीचे डिस्क असलेल्या टायर व ४२ हजार रुपये किमतीचे टायर असा चोरी केलेला पावणेतीन लाखांचा मुद्देमाल मिळून आला.

याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातील हवलदार शेखर शिंगाडे यांनी फिर्याद दिली असून, पोलिस हवलदार सर्जेराव सूळ हे अधिक तपास करत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले, पोलिस उपनिरीक्षक विशाल कदम, हवालदार देवेंद्र पाडवी, सर्जेराव सूळ, धनाजी भिसे, संतोष नाळे, विठ्ठल काळे, रमेश वळवी, केतन लाळगे, अंकुश कोळेकर, सतीश दडस, जयवंत यादव, संजय चव्हाण, होमगार्ड रवींद्र व्हटकर, दत्तात्रय येळे, अमर शेळके आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बाल हक्क संरक्षणासाठी ‘बालरक्षा अभियान’ राबवणार : अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह
पुढील बातमी
एआय तंत्रज्ञान आधारित प्रणालीमुळे राज्यात दुसरी निल क्रांती : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

संबंधित बातम्या