सातारा : मारहाण करुन जबरी चोरी केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हर्षद जगन्नाथ मोरे (वय 25, रा. करंडी ता.सातारा) या युवकाने निलेश मोरे, राहूल महामुलकर, विराज पवार, रोहित यादव, सचिन शिंदे यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 9 ऑगस्ट रोजी महामार्गावरील खिंडवाडी ता.सातारा येथे घडली आहे. संशयितांनी मारहाण करत दूध कलेक्शनचे मशीन, रोख रक्कम असा सुमारे 14500 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.