इस्रोच पुढचे मिशन शुक्र

कधी लॉन्च होणार? मोहिमेसाठी शुक्र ग्रहाची निवड का केली?

by Team Satara Today | published on : 24 September 2024


नवी दिल्ली : सूर्य, चंद्र, मंगळ मोहिमेनंतर भारताची नजर आता शुक्र ग्रहावर आहे. केंद्रीय कॅबिनेटने चार अवकाश प्रोजेक्टसना मंजुरी दिली आहे. यात एक शुक्र ग्रहाची मोहिम आहे. याला मोहिमेला वीनस ऑर्बिटर मिशनच (VOM) नाव देण्यात आलय. पीएम मोदी यांनी सोशल मीडिया X वर पोस्ट करुन भारत मार्च 2028 पर्यंत मिशन लॉन्च करेल, असं म्हटलं आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो हे मिशन प्रत्यक्षात आणेल. वीनस ऑर्बिटर मिशनसाठी (VOM) भारत 1236 कोटी रुपये खर्च करणार आहे. यात 824 कोटी रुपये फक्त स्पेसक्राफ्टवर खर्च येणार आहे. आता प्रश्न हा आहे की, हे मिशन काय आहे? या मिशनद्वारे काय सिद्ध करायचय? हे स्पेसक्राफ्ट इतकं खास का?

या मिशनच्या माध्यमातून इस्रो शुक्राच्या कक्षेत स्पेसक्राफ्ट पाठवणार आहे. अनेक वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातील. शुक्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाईल. शुक्र ग्रहावरील वातावरण समजून घेण्याचा प्रयत्न होईल. शुक्र सोलार सिस्टिममधला सर्वात तप्त ग्रह आहे. सूर्याचा शुक्रावरील प्रभाव समजून घेण्याच्या दृष्टीने सुद्धा ही मोहिम महत्त्वाची आहे.

स्पेसक्राफ्ट शुक्रावर उतरणार का?

हे एकप्रकारच ऑर्बिटर मिशन आहे. या मिशनच्या माध्यमातून पाठवलं जाणार स्पेसक्राफ्ट शुक्र ग्रहाच्या कक्षेत पोहोचेल. पण ते ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरणार नाही. स्पेसक्राफ्टला अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आलं आहे की, पृष्ठभागाच्या वर असतानाच सर्व प्रयोग केले जातील. म्हणूनच हे स्पेसक्राफ्ट खास आहे. द प्रिंटला इस्रोच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

मिशनसाठी शुक्र ग्रहाची निवड का केली?

शुक्राच्या अभ्यासातून पृथ्वीला अजून चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. सौर मंडळातील हा सर्वात तप्त ग्रह कधीकाळी राहण्यायोग्य होता. शुक्र ग्रहावर झालेल्या बदलांचा अभ्यास केला जाईल. कारण शुक्र ग्रह पृथ्वीसारखा मानला जातो. शुक्र आणि पृथ्वीला सिस्टर प्लेनेट म्हणतात. यातून दोघांची झालेली प्रगती, बदल समजून घेता येतील. शुक्र मिशनमधून भारताला ग्रहांबद्दल महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग माहिती मिळेल. ‘हे मिशन टेक्नोलॉजी विकास क्षमता आणि वैज्ञानिक कौशल्याच प्रदर्शन असेल’ असं इस्रोच्या अधिकाऱ्याने सांगितलं.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अंतराळात सुनीता विल्यम्स यांचा नवा विक्रम
पुढील बातमी
शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिकांना जुनी पेन्शन लागू करावी

संबंधित बातम्या