सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी क्रेन चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर-पुणे महामार्गावर रवींद्र बाबासो वाटांबळे रा. निनाम पाडळी, ता. सातारा हे त्यांच्या दुचाकीवरून सातारा कडे येत असताना क्रेन क्र. एमएच 11 डीएन 8572 वरील चालक प्रवीण भोसले रा. देगाव, ता. सातारा याने क्रेन रॉंग साईडने घेऊन समोरून जोराची धडक दिल्याने रवींद्र वाटांबळे हे जखमी झाले आहेत. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.