जालना : राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीच्यापूर्वी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणासाठी नेते आक्रमक भूमिका घेत आंदोलनं करत आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी निशाणा साधला आहे. मराठा युवकांच्या नुकसानीसाठी आणि आत्महत्येसाठी जरांगे पाटील जबाबदार असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. सर्व प्रमुख चार पक्ष ओबीसी विरोधी निर्णय घेत असून सर्व नेत्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली. हाके म्हणाले की, “शरद पवार, एकनाथ शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी ओबीसीबाबत भूमिका जाहीर करावी. कारणे हे नेते ओबीसीबाबत ब्र शब्द बोलत नाहीत. त्यामुळे ओबीसी आपल्या रक्षणासाठी ओबीसी निषेध करेल. आणि जवळ आलेल्या निवडणूकीमध्ये त्याप्रमाणे मतदान करेल. जर शरद पवार यांच्या बारामतीमध्ये ओबीसी एकवटला तरी बाळासाहेब आंबेडकर म्हणतात तसे होण्याची तंतोतंत खरे होतील. यामुळे आजी माजी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला आहे,” अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. यावेळी त्यांनी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
पुढे लक्ष्मण हाके यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला. लक्ष्मण हाके म्हणाले की, “मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे गरजवंताचा लढा, शोषितांचा लढा, आरक्षणाचा लढा म्हणून सुरु झाला आणि तो राजकारणावर येऊन थांबला. हे जरांगे स्वतःच्या डोक्यातून चळवळीचे नेते किंवा त्यांना खूप आरक्षणाचा अभ्यास आहे, त्यांचं शिक्षण झालंय किंवा त्यांना ज्ञान आहे, असं नव्हतंच. हे एका तासामध्ये संपलेलं आंदोलन शरद पवार यांनी जरांगे पाटील यांना आणून बसवला. गणशोत्सवामध्ये ज्याप्रमाणे 10 दिवस गणपती आणून बसवला जातो आणि मोहोल तयार केलं जातो. त्याचप्रमाणे जरांगे पाटील यांना आणून बसवण्यात आलं आणि राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम शरद पवार यांनी केलं,” अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, “शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र नाहीत. पृथ्वीराज चव्हाण हे जर मराठा समाजासाठी भूमिका घेत असतील तर कॉंग्रेसने त्यांची ओबीसीबाबत भूमिका स्पष्ट करावी. नाहीतर पृथ्वीराज चव्हाण यांनी अफगाणिस्तानमध्ये राहायला जावं. नाहीतर राहुल गांधींनी त्यांची काश्मीरमध्ये राहण्याची सोय करावी. तिथं जातीय भूमिका घ्यायला त्यांना वाव आहे. कारण हा महाराष्ट्र 18 पगडं जातींचा आहे. जरांगे पाटील यांचं आंदोलन काहीही समाजिक नाही. जरांगे पाटील यांचं वागणं संविधानविरोधी आणि घटनाविरोधी आहे. आणि त्यांना पाठिंबा देण्याचं काम मिस्टर संभाजी भोसले करतात आणि शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील करतात. जरांगे पाटील यांचं आंदोलनावर अभ्यासू मराठा समाज नाराज आहे. प्रचंड संभ्रमामध्ये मराठा समाज आणि बांधव आहेत. काही लोकं आत्महत्या करत आहेत. या आत्महत्यांना जबाबदार जरांगे नावाचा माणूस आहे, असा आरोप आम्ही करत आहोत,” अशी घणाघाती टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल |
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |