जकातवाडी येथील तरुणी अद्याप बेपत्ता; दोन दिवसांपासून संपर्क तुटल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण

by Team Satara Today | published on : 01 June 2026


सातारा : जकातवाडी येथील एका तरुणीचा मागील दोन दिवसांपासून संपर्क तुटल्याने तिच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सातारा तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित युवती 30 मे रोजी सकाळी घरातून बाहेर गेल्यानंतर परतली नसल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. नातेवाईकांनी विविध ठिकाणी शोध घेतला, मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा मिळू शकला नाही.

तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार घोरपडे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जवळवाडी फाटा येथील ज्योतिबा मंदिर परिसरात धारदार शस्त्रासह फिरणारा जेरबंद
पुढील बातमी
भरतगाववाडी परिसरात घडलेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू

संबंधित बातम्या