शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

सातारा : शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान कोयना हौसिंग सोसायटी, सदर बाजार, सातारा येथील कण्हेर उजवा कालव्याची एक बाजू जेसीबीने फोडून त्यामध्ये सांडपाण्याची पाईप सोडून पुन्हा कालवा मुजवून शासकीय मालमत्तेचे सुमारे दीड लाखांचे नुकसान करून कालव्याला धोका निर्माण करीत कालव्याच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी शेखर वैंकु राठोड रा. कोयना हौसिंग सोसायटी रा. सदर बाजार, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.


मागील बातमी
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी
पुढील बातमी
राष्ट्रवादी अजितदादा गटाची जिल्ह्यात पक्ष बांधणी सुरू

संबंधित बातम्या