सातारा : एकास जमिनीच्या जुन्या वादातून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हा प्रकार दि. 27 रोजी घडला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात अमित गोरखनाथ देवकर (वय 34, रा. धनगरवाडी, पो. निगडी तर्फ धनगरवडी, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, दत्तात्रेय भानुदास देवकर, यश दत्तात्रेय देवकर, करण सुखदेव देवकर, जीवन सुखदेव देवकर (सर्व रा. देवकरवाडी- धनगरवाडी, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार गायकवाड तपास करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026