मोळाचा ओढा येथे जुगार अड्ड्यावर छापा; रोख रक्कम व दुचाकीसह मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 09 July 2026


सातारा : मोळाचा ओढा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी धाड टाकून एकावर कारवाई करत रोख रक्कम, दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा 55 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 8 रोजी दुपारी जगदंब पान शॉपलगत पत्र्याच्या शेडच्या आड सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी समीर आबाजी कांबळे (वय 42, रा. कोंडवे, ता. सातारा) याला ताब्यात घेण्यात आले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सुरू असल्याने पोवई नाका-बॉम्बे रेस्टॉरंट चौक मार्गावर अवजड वाहनांना बंदी; 30 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीत मोठे बदल
पुढील बातमी
कारमधून कोयता व लोखंडी गजांची वाहतूक करणार्‍या एकास अटक; साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या