वावदरे गावच्या हद्दीत असणार्‍या पवनचक्कीमधील केबल चोरीप्रकरणी अज्ञातावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 30 July 2026


सातारा : पवनचक्की मधील केबल चोरी प्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वावदरे, ता. सातारा गावच्या हद्दीत असणार्‍या पवनचक्की टॉवरची 50 मीटर लांबीची, आठ हजार रुपये किंमतीची केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद दीपक वसंत घाडगे रा. म्हावशी, ता. पाटण यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार कर्णे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गुटखा विक्री प्रकरणी सातारा शहरातील दोन पानपट्टी चालकांवर गुन्हे
पुढील बातमी
गुरुवार पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा टाकून एका व्यक्तीवर कारवाई

संबंधित बातम्या