सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड २० मार्चला; ११ पंचायत समित्यांतील सभापती-उपसभापती निवड १६ मार्च रोजी

by Team Satara Today | published on : 06 March 2026


सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवार दि. २० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सभागृह, सातारा येथे होणार आहे. ही निवडणूक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तसेच जिल्ह्यातील सर्व ११ पंचायत समित्यांमधील सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका सोमवार दि. १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संबंधित तालुक्यांच्या पंचायत समिती सभागृहात घेण्यात येणार आहेत. या निवडणुका जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नियुक्त केलेल्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या पिठासन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडतील.

या संदर्भातील अधिकृत नोटीस दि. ६ मार्च २०२६ रोजी काढण्यात आली असून, त्यांची बजावणी करण्यासाठी संबंधित तहसीलदारांकडे पाठविण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरातील व्यंकटपुरा पेठ येथील श्रीराम सहवास अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

संबंधित बातम्या