सातारा : युवतीच्या विनयभंग प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी तसेच त्या आधीही एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी अमीन उर्फ सोनू अशपाक शेख आणि मुस्तफा अशपाक शेख दोघेही रा. सदर बाजार, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सावजी करीत आहेत.