अंगभूत कलागुणांना व्यवसायिकतेचे रूप द्या

डॉ. भाग्यश्री मोहन : भारत बियाँड बाउंड्रीजचे पुरस्कार प्रदान

by Team Satara Today | published on : 28 October 2025


सातारा : नोकरी करताना येणाऱ्या मर्यादांचा विचार करून आपल्यातील अंगभूत कला कौशल्याला वाव देऊन त्यातून अर्थार्जण करणे ही काळाची गरज आहे. आपल्यातील कौशल्य शोधून त्यांना व्यावसायिकतेचे स्वरूप दिले तर लाखो रुपयांची उलाढाल करता येते हे भारत बियाँड बाउंड्रीसच्या पुरस्कारांच्या निमित्ताने अधोरेखित झाले असे मत मोटिवेशनल स्पीकर आणि बिझनेस कोच डॉ. भाग्यश्री मोहन यांनी व्यक्त केले.

महाबळेश्वर येथे झालेल्या भारत बियाँड बाउंड्रीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित मार्गदर्शन करताना डॉ. भाग्यश्री बोलत होत्या. विचार मंचावर कर्नल मोहन शिंदे, एचडीएफसी बँकेचे उपव्यवस्थापक योगेश लुंकड, भारत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भारत पाटील रॉक लाईक वेंचर्सचे सीईओ निखिल पवार यांची प्रमुख उपस्थित होती.

या पुरस्कार सोहळ्यात मिलियन रूपी एंकर होण्याचा मान आर. जे. सोमा सरकार, संध्या काबरा, मोहिनी लोहार,      बीना शरदचंद्र देवधर, निहारिका शिंदे, प्रीती किशोर जखोट्या यांनी मिळविला. तर     श्रेया खाबिया, तुलिका चौरेशिया, दीपाली वैभव परब, पूर्णिमा वगळ सुपर हिरो ठरलै. सुपरहिरो अवॉर्डचे नेहा सिद्धार्थ जैन, श्वेता भोक्रे, पूनम चौधरी,  शुभम अटोळे, तेजश्री एस. एच., नितीन गुप्ता, राधा ठाक्कर, सीमा भिवारे मानकरी ठरले. हिरो अवॉर्ड साठी मुक्ति पंसरे, नमिता पाडीत, सग्निका चॅटर्जी यांची निवड झाली. रायझिंग स्टार म्हणून हेमंत टी. वाठोरे, अमोल कैलास वलुंज, तेजश्री एस. एच., पूजा आनंद पाटील, प्रिया पाटणी, कल्याणी रंगारी, सग्निका चॅटर्जी, डॉ. प्रियांका रॉय, गीता धरेश्वर, प्रियांका पवार, शुभम पाटील, अश्विन तलरेजा यांना सन्मानित करण्यात आले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा एसटी स्टँड परिसरात अज्ञात महिलेने लांबवले एक लाख 7 हजार रुपयांचे दागिने
पुढील बातमी
सभासद- शेतकऱ्यांच्या सहकार्याने 'अजिंक्यतारा' प्रगतीपथावर

संबंधित बातम्या