सातारा : राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ५ मार्च २०२५ रोजी जागतिक कर्णबधिरता दिन व सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने रुग्णालयामध्ये येणा-या रुग्णांची कान, नाक व घसा तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी दिली आहे.
तसेच जिल्हयातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करून रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.