सातारा : अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आडोशास विकास दिलीप कोकरे रा. केसरकर पेठ, सातारा हा बेकायदेशीररित्या अंमली पदार्थाचे सेवन करीत असताना आढळून आला. अधिक तपास पोलीस हवालदार वाघ करीत आहेत.