सातारा : येथील पोवई नाका परिसरातील हॉटेल रसोई समोर असलेल्या कंपाउंडमधून दुचाकी चोरीची घटना घडली आहे. याप्रकरणी सुभाष सर्जेराव माने (वय ६४, रा. गडकर आळी, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आपली राखाडी रंगाची बजाज CT 100 कंपनीची मोटारसायकल (क्र. MH-11-AD-9490) हॅण्डल लॉक करून कंपाउंडमध्ये पार्क केली होती. मात्र अज्ञात चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली. चोरीस गेलेल्या मोटारसायकलीची किंमत सुमारे १० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सदर वाहनाचा इंजिन क्रमांक BMH20571 व चेसिस क्रमांक CMH18353 असा आहे.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.