सातारा : आपल्या मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीने आज दि. 20 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, 15 दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा परिषदे ला टाळे ठोक आंदोलन करणार असल्याचा इशारा बहुजन मुक्ती पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी तुषार मोतलिंग यांनी प्रशासनास दिला आहे.
बहुजन मुक्ती पार्टीच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान विभागांमधील ओबीसी, एससी, एसटी या जातीमधील बंधू-भगिनींच्या नोकर्या जातीयवादी मानसिकतेतून हडपणार्या (भरती बिंदू नामावली प्रमाणे केलेली नाही) डॉ. अनिरुद्ध आठल्ये, डॉ. राधाकिशन पवार, डॉ. महेश खलिपे, अनामिका घाडगे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. जितेंद्र देसाई हे गेली 13 वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे बेकायदेशीरित्या स्वीय सहायक (शिपाई मधून पदोन्नती) म्हणून काम करत असल्याने मागासवर्गीयांवर अन्याय होत आहे. तसेच भ्रष्टाचारही वाढला आहे. त्याची हकालपट्टी करावी. बोगस टायपिंग प्रमाणपत्र देणार्या 22 कर्मचार्यांवर पुणे विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागण्या आहेत.
या मागण्यांच्या अनुषंगाने आज बहुजन मुक्ती पार्टी चे ठिय्या आंदोलन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या दालनाबाहेर करण्यात आले. या आंदोलनामध्ये बहुजन मुक्ती पार्टी चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलन करीत असताना पोलीस प्रशासनाने तुषार मोतलिंग व इतर पदाधिकार्यांना इथे आंदोलन करू नका. तुम्हाला परवानगी नाही, असे सांगितले. परंतु यावर मोतलिंग म्हणाले की आर्टिकल 19 नुसार आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार आहे. यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, येत्या पंधरा दिवसात मागण्या मान्य नाही झाल्या तर जिल्हा परिषदे ला टाळे ठोक आंदोलन करणार असल्याचे तुषार मोतलिंग यांनी सांगितले.
या आंदोलनामध्ये सुनिता कसबे, ज्योस्त्ना सरतापे, अजित नलावडे, शिवराज झेंडे, सोमनाथ आवळे, भरत ठोंबरे, लहू भिसे, सुनील कांबळे, रुक्मिणी वाघमारे, छाया चव्हाण, जयश्री सोनवणे, सुहास गायकवाड, मंजुळा वाघमारे, संदीप चव्हाण, सतेश गायकवाड, शीतल जाधव, शीतल गायकवाड, निर्मला लांडगे आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता.