श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने उद्यापासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ

१२ जानेवारी रोजी होणार रथोत्सव सोहळा; पारायण सोहळ्यास महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी

सातारा : महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या वाठार स्टेशन येथील श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या ८९ व्या पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यतिथी व रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक ४ जानेवारी पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात होणार असून यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे ४ जानेवारी रोजी ह.भ.प योगेश महाराज यादव, सोळशी यांची कीर्तन सेवा आयोजित केली आहे तर दुसऱ्या दिवशी ५ जानेवारी रोजी ह.भ.प युवकमित्र गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांची कीर्तन सेवा आहे तसेच तिसऱ्या दिवशी ६ जानेवारी रोजी ह.भ.प श्री अशोक महाराज इलग शास्त्री, बोधेगाव अहमदनगर यांची कीर्तन सेवा आयोजित केली आहे तर चौथ्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक ७ जानेवारी रोजी ह.भ.प श्री संजय नाना धोंगडे, नाशिक यांची कीर्तन सेवा आयोजित केली आहे त्याचप्रमाणे पाचव्या दिवशी ८ जानेवारीची किर्तनसेवा ह.भ.प श्रीगुरु पुंडलिक महाराज देहूकर, श्री संत तुकाराम महाराजांचे विद्यमान ११ वंशज श्री क्षेत्र देहू यांची आहे तर सहाव्या दिवशी ९ जानेवारी रोजी ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज तांबे, जेऊर हवेली अहमदनगर यांची कीर्तन सेवा आहे तसेच सातव्या दिवशी शुक्रवार १० जानेवारी रोजी ह.भ.प श्रावण महाराज अहिरे, नाशिक मालेगाव यांची आहे तर आठव्या दिवशी शनिवार ११ जानेवारी रोजी काल्याचे किर्तन परमहंस परिव्रजकाचार्य श्री १००८ आचार्य स्वामी ह.भ.प श्री हरिचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज एम.ए.तत्वज्ञान काशी यांचे किर्तन सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे

तर पुण्यतिथी दिवशी सोमवार १३ जानेवारी रोजी श्री संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज असणारे ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज नामदास पंढरपूर यांचे फुलाचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे त्याचप्रमाणे या सर्व पारायण सोहळ्यामध्ये नामवंत प्रवचनकार यांची सेवा दररोज सायंकाळी ६ वाजता आयोजित केलीआहे तर रथोत्सव सोहळ्यादिवशी रथपूजन हे श्री प.पू श्री महंत १०८ सुंदरगिरीजी महाराज, मठाधिपती सेवागिरी महाराज देवस्थान पुसेगाव यांच्या शुभहस्ते होणार असून यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मा. खासदार धैर्यशील मोहिते पाटील,माढा लोकसभा मतदारसंघ, खासदार नितीन काका पाटील, राज्यसभा, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माढा लोकसभा मतदारसंघ, माजी खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे धनगर समाज समिती राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार सचिन कांबळे पाटील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ, आमदार महेश शिंदे कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघ, आमदार गोपीचंद पडळकर जत विधानसभा मतदारसंघ, माजी आमदार दीपक चव्हाण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर माजी अध्यक्ष सातारा जिल्हा परिषद, बाळासाहेब सोळस्कर माजी चेअरमन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा, अमित चव्हाण पश्चिम महाराष्ट्र निवडणूक समन्वयक भाजपा, अभिजीत अरविंद देवकाते पाटील प्रमुख विश्वस्त श्री मार्तंड देवस्थान संस्थान जेजुरी, रणजीत गायकवाड अध्यक्ष महाराष्ट्र कामगार स्वराज्य सेना कांदिवली मुंबई, अविनाश माने सहाय्यक पोलीस निरीक्षक वाठार पोलीस स्टेशन, सौ.निता संजय माने सरपंच ग्रामपंचायत वाठार स्टेशन, यांच्या हस्ते रथाचे पूजन होऊन भव्य दिव्य अशी संपूर्ण वाठार नगरीला प्रदक्षिणा करणारी रथ मिरवणूक निघणार आहे तसे पाहिले तर संपूर्ण महाराष्ट्रात श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांचे भक्तगण आहेत हे भक्तगण रथोत्सवादिवशी वाठार नगरीमध्ये दाखल होऊन रथोत्सवाची शोभा वाढवीत असतात जागोजागी ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये घोडे, उंट, हत्ती, ढोल लेझीम व बँड पथकांमुळे रथोत्सवाला मोठ्या प्रमाणात शोभा येते.

रथोत्सवादिवशी वाठार स्टेशन नगरीतील ग्रामस्थ हे जागोजागी रथ ओढणाऱ्या नागरिकांना व भावीक भक्तांना मोठ्या प्रमाणात अन्नदान करताना दिसून येतात व संपूर्ण वाठार स्टेशन नगरीमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

 

संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्तगण दरवर्षी श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांच्या रथोत्सव सोहळ्याला हजेरी लावत असतात.
यावर्षी ८९ व्या पुण्यतिथी निमित्ताने ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. देवस्थानच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांची कोणतीच गैरसोय होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे.
- निवृत्तीभाऊ करे
अध्यक्ष,
श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज देवस्थान ट्रस्ट.


मागील बातमी
कोविड-१९ च्या ५ वर्षांनंतर चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा उद्रेक
पुढील बातमी
मोहनलाल यांनी केला 'दृश्यम ३'बद्दल मोठा खुलासा

संबंधित बातम्या