राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्त पीएम मोदींच्या देशवासियांना खास शुभेच्छा

अयोध्या : अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ शेअर करत देशवासियांना खास शुभेच्छा दिल्या. एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी लिहिले की, "शतकानुशतके झालेल्या त्याग, तपस्या आणि संघर्षातून निर्माण झालेले हे मंदिर आपल्या संस्कृतीचे आणि अध्यात्माचे महान वैभव आहे. मला विश्वास आहे की हे दिव्य आणि भव्य राममंदिर विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी मोठी प्रेरणा ठरेल."

राम लल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाचा आनंद दिव्य, भव्य, तेजस्वी, चकाचक अयोध्येत ओसंडून वाहत आहे. प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा केला जाणारा तीन दिवसांचा वर्धापन दिन सोहळा आजपासून सुरू झाला आहे. 

रामलल्लासाठी आणि बाल राम यांच्या उत्सवमूर्तीसाठी दिल्लीत विशेष कपडे तयार करण्यात आली आहेत. या कपड्यांचे विणकाम आणि भरतकाम सोने आणि चांदीच्या तारांनी केले आहे. तसेच, विविध ठिकाणी चांदीचे ठसे काढण्यात आले आहेत.

मागील बातमी
मॅनेजरच्या घरात घुसून वाल्मीक कराडच्या मुलाने दाखवली बंदूक
पुढील बातमी
बीड हत्याकांडातील 8 आरोपींना मोक्का

संबंधित बातम्या