सातारा : अतीत, ता. सातारा येथील पती, पत्नी व मुलास मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी हा प्रकार घडला. बोरगाव पोलीस ठाण्यात सतीश बापू कांबळे (वय 52, रा. अतीत) यांनी फिर्याद दिली असून, मंजुषा काळे, चिंतामणी काळे, अनिकेत चिंतामणी काळे, सौरभ प्रकाश काळे, प्रसन्न सुरेश कांबळे, सनी चव्हाण, शुभम चव्हाण, प्रतीक कांबळे (सर्व रा. अतीत) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.