लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी रघुनाथ बाबर, उपाध्यक्षपदी डॉ.रमाकांत साठे

by Team Satara Today | published on : 23 July 2026


सातारा : साताऱ्यात होणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी रघुनाथ बाबर यांची तर  उपाध्यक्षपदी डॉ.रमाकांत साठे सर्वानुमते करण्यात आली. 

यावर्षी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमांनी साजरी करणार असल्याचे अध्यक्ष रघुनाथ बाबर, व उपाध्यक्ष डॉ.रमाकांत साठे यांनी सांगितले. 

 यावेळी अण्णा वायदंडे, उमेश चव्हाण, सत्यवान कमाने, किशोर गालफाडे, उमेश खंडू जोडे, दिलीप कांबळे, किशोर शिंदे, नितीन तुपे, सागर शिंदे, महेश वायदंडे, प्रवीण बोभाटे, ,मनीषा चव्हाण, सविता कणसे, रीना भोसले, आशिकी गुंजाळ, विमलताई शिंदे, नितीन भोसले, सुभाष गुंजाळ, वैभव गवळी इत्यादी शेकडो कार्यकर्ते निवडीच्या वेळेस उपस्थित होते.

यावेळी जयंती उत्सव समितीचा कार्यक्रम सर्वांना बरोबर घेऊन करणार असल्याचे अध्यक्ष रघुनाथ बाबर व उपाध्यक्ष डॉ. रमाकांत साठे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी रघुनाथ बाबर, उपाध्यक्षपदी डॉ.रमाकांत साठे

संबंधित बातम्या