सातारा : ट्रॅक्टरच्या धडकेत एकजण जखमी झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेंद्रे ता.सातारा येथे ट्रॅक्टरची धडक बसल्याने गहिनीनाथ केशव साळवे (वय 50, मूळ रा.बीड) हे जखमी झाले. ते झोपले असताना अज्ञात ट्रॅक्टरची धडक बसली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक तेथे थांबला नाही. अपघातामुळे साळवे गंभीर जखमी झाले आहेत.