सातारा : अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी दोन महिलांसह तीन जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अजंठा चौक परिसरात एक वृद्ध महिला अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आली. तिच्याकडून 640 रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या घटनेत, डबेवाडी, तालुका सातारा येथे तेथीलच आशिष पांडुरंग देवरुखे हा दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून दोन हजार रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. तिसऱ्या घटनेत, मल्हार पेठ सातारा येथे एक महिला दारू विक्री करताना आढळून आली. तिच्याकडून 640 रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.