सातारा : शहर पोलिसांनी गोडोली आणि गुरुवार परज या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी सचिन भानुदास अवघडे (रा. सासपडे.ता.जि. सातारा) आणि अभय बाबुराव मोहिते (रा. मंगळवार पेठ,सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.दोघांकडून जुगाराच्या अड्ड्यावरून एकूण १४७० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सातारा शहर पोलिसांचा गोडोली आणि गुरुवार परज येथील जुगार अड्ड्यांवर छापा
by Team Satara Today | published on : 26 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा