सातारा : राज्यभरासह सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची संक्रात गोड होण्याची चिन्हे दिसून येत असून नोव्हेंबर, डिसेंबर २०२५, जानेवारी २०२६ या तिन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याबाबत हालचाली सुरू झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या वर्षातील शेवटचा डिसेंबर महिना संपण्यास काही दिवसांचा अवधी उरला असतानाही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे लाडक्या बहिणीचे हप्ते बँकांमध्ये जमा न झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या आठ लाख लाभार्थी महिला असून त्यांच्यापैकी काहींना अनुदानाच्या विलंबामुळे आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. लडकी सहभागी झालेल्या महिलांना ई- केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली असून अद्याप अनेक महिलांची केवायसी होणे बाकी आहे. ज्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या बहिणी आता अनुदानाचे हप्ते मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. केवायसी करता न आल्याने लाखांपेक्षा अधिक महिलांना अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दि. ३१ डिसेंबर पर्यंत केवायसी बंधनकारक असून सध्या केवायसी करण्याकडे महिलांचा कल दिसून येत आहे. दरम्यान डिसेंबर महिना संपत आला तरी नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही. दरम्यान डिसेंबर अखेरीस नोव्हेंबरचा तसेच संक्रात आणि महापालिका निवडणुकीच्या मतदान होईल डिसेंबर जानेवारीचे हप्ते देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाडकी बहिणींची संक्रात गोड होण्यास मदत होणार आहे.