विना नंबर प्लेट व मोठ्या आवाजाच्या बुलेटला पंचावन्न हजार रुपये दंड, फलटणमध्ये मोहीम कडक

by Team Satara Today | published on : 02 March 2026


फलटण : फलटण शहर पोलीस ठाणेकडुन फलटण शहरात मोठया व कर्कश आवाजात फिरणा-या मोटार सायकली व विनाकारण वेगात चालविण्या-या मोटार सायकल बाबत विशेष मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमे अंतर्गत फलटण शहर पोलीस ठाणेकडुन एकुण ६ बुलेट व १ यामाहा अशा मोटार सायकल ताव्यात घेवुन त्या मोटार सायकल बुलेट या मॉडीफाय केलेले सायलेन्सर बसविण्यात आलेले होते. व १ यामाहा गाडी मॉडीफाय करण्यात आलेली होती. त्यांना तब्बल 55500 रुपये दंड आकरण्यात आला आहे.

सदर गाडयावर प्रभावी कारवाई व्हावी या करिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना त्या मोटार सायकलवर कारवाई करण्याकरिता अहवाल पाठविण्यात आला. त्या अहवालाच्या अनुशंगाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सदर मोटार सायकलची तपासणी करुन घेवुन मोटार सायकल चालक व मालक यांना एकुण ५५,५००/- रुपये दंड आकरण्यात करण्यात आलेला आहे. तसेच बुलेट मोटार सायकलचे सायलेन्सर काढुन घेण्यात आलेले आहेत. तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याकडुन सदर मोटार सायकल यांचेवर मोटार वाहन कायदयाअन्वये प्रलंबित असलेला ५,०००/- दंड देखील वसुल करण्यात आला आहे. असा एकुण ६०,५००/- रुपये दंड वसुल करण्यात आलेला आहे.

अशा प्रकाराची फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोठ्या व कर्कश आवाजात फिरणा-या मोटार सायकली व विनाकारण वेगात चालविण्या-या मोटार सायकल स्वार तसेच गाडी मालकांवर सातत्याने कारवाई सुरु राहणार आहे. सदरची कारवाई  तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सो, सातारा, डॉ. वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा, विशाल खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग फलटण, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक अरविंदकाळे, सफौ. एस. एस. शिंदे, पो.कॉ.पी. बी. धायगुडे, पो.कॉ. आर. डी. खरात, पो. कॉ.एस. बी. जगताप,पो.कॉ.एस.एस. परिहार यांनी केलेली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुलीवर केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी केलेल्या खूनप्रकरणी एकाच कुटूंबातील चौघांना अटक; काहीही धागेदोरे गुन्हा उघडकीस आणला
पुढील बातमी
गीत गायनाने समता वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य ! रमिजा सय्यद, विलास जावळे, शेखर कांबळे, यशेंद्र क्षीरसागर यांनी सादर केली गाणी

संबंधित बातम्या