सातारा : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने १५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारा आयसीसी वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन आज सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केंद्र सरकारपर्यंत ही मागणी तातडीने पोहोचवावी, अशी विनंती केली. “आतंकवाद आणि क्रिकेट एकत्र चालू शकत नाहीत” अशी भूमिका मांडत, पाकिस्तानकडून होत असलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर भारताने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सीमा पार दहशतवाद सुरू असताना पाकिस्तानसोबत कोणतेही क्रीडा संबंध ठेवणे योग्य नाही. शहीद जवान व दहशतवादी हल्ल्यांतील नागरिकांच्या भावनांचा आदर राखण्यासाठी हा सामना बहिष्कृत करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.