खोडशी धरणाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खोडशी धरणाची व कालव्याची पाहणी

by Team Satara Today | published on : 26 July 2026


सातारा : कराड तालुक्यातील खोडशी धरणाचे काम बऱ्याच वर्षांपासून अपूर्ण आहे. हे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करणार असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले 

मंत्री श्री. विखे पाटील यांनी खोडशी धरणाची व कालव्याची पाहणी केली. याप्रसंगी आमदार धैर्यशील कदम, अतुल भोसले, मनोज घोरपडे यांच्यासह जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते. 

कराड येथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार आज खोडशी धरणाला भेट दिली. या धरणाचे काम बऱ्याच वर्षापासून अपूर्ण आहे या कामाला निधी उपलब्ध करून दिला जाईल व मार्च 2027 पर्यंत पूर्ण केले जाईल. 

या धरणाच्या कालव्यामधून  गटाराचे व कचरा मोठ्या प्रमाणात जात आहे. त्यामुळे दूषित पाणी शेतकऱ्यांच्या विहिरी व शेतामध्ये जात आहे याचा त्रास त्यांना होत आहे. त्यामुळे हा कालवा बंदिस्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

यानंतर मंत्री श्री. विखे पाटील यांनी टेंभू उपसा सिंचन योजनेला भेट देऊन या योजनेची जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रशासनाने अत्यंत संवेदनशीलतेने नागरिकांचे प्रश्न तात्काळ निकाली काढावेत - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, छ. शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात
पुढील बातमी
व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल - विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन

संबंधित बातम्या