सातारा : चांदणी चौकापासून हाकेच्या अंतरावर असणार्या यादोगोपाळ पेठेतील राजधानी कॉम्प्लेक्स मधल्या सदनिका धारकांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. तुळजाभवानी कॉम्प्लेक्स च्या बेसमेंट मध्ये सुरू असलेले चक्री मटका व अवैध दारू सेवन यावर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सातारा शहर परिसरात अवैध दारू सेवन, चक्री व मटका व्यवसाय सुरू असल्याच्या नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सातारा शहर पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र अजूनही शहराच्या विविध भागातील हे अवैध व्यवसाय नागरिकांच्या अडचणीचे ठरत आहेत. असाच काहीसा प्रकार यादोगोपाळ पेठेतील तुळजाभवानी कॉम्प्लेक्स मध्ये घडत आहे. या कॉम्प्लेक्स च्या बेसमेंट मध्ये एक बियर बार असून रात्री अपरात्री दारू पिणार्यांची संख्या आणि तेथे येणार्यांची संख्या जास्त आहे. तसेच येथे इमारतीच्या कोपर्यामध्ये अवैध मटका व जुगाराचा चक्री प्रकार चालतो. त्यामुळे येथील नागरिकांचे सामाजिक जीवन धोक्यात आले आहे.
येथील महिलांनी 112 क्रमांकावर डायल करून या प्रकाराची वेळोवेळी तक्रार केली. तेव्हा शाहूपुरी पोलीस त्यांना त्यांची नावे सांगा, अशी मागणी करत आहेत. या प्रकाराबाबत महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शाहूपुरी पोलिसांनी ठोस कारवाई करून हे अवैध प्रकार बंद करावेत, अशी त्यांची मागणी आहे. मात्र या मागणीची गांभीर्याने दखल घेण्यात न आल्याने महिलांनी टोकाचा पवित्रा घेत थेट पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन सादर केले.
यादोगोपाळ पेठेतील अनधिकृत व्यवसाय विरोधात महिला आक्रमक
तुळजाभवानी कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी पोलीस अधीक्षकांना केले निवेदन सादर
by Team Satara Today | published on : 13 August 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा