एमआयडीसीतील माने कॉलनी परिसरात घराबाहेर लावलेल्या दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 27 August 2026


सातारा : एमआयडीसीतील माने कॉलनी परिसरात घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माने कॉलनीतील प्लॉट क्रमांक 5 येथे 16 रोजी रात्री साडेअकरा ते 17 रोजी सकाळी सात या कालावधीत ही चोरी झाली. स्वाती दीपक माने (वय 39) यांनी याबाबत फिर्याद दिली. घरासमोर पार्क केलेली मोटारसायकल अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संगम हौसिंग सोसायटी परिसरात भावजयच्या दगडफेकीत वृद्ध जखमी
पुढील बातमी
नांदेडमधील किरपाण हल्ला आणि अकाली दलाचे राजकीय ग्रहण; पंथिक विश्वासाच्या संकटात बादल घराणे

संबंधित बातम्या