चार चाकी वाहन परस्पर विकल्या प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 12 August 2025


सातारा : लग्नकार्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात दिलेली महिंद्रा कंपनीची थार जीप परस्पर विकल्या प्रकरणी प्रतापसिंह नगर खेड येथील युवराज रामचंद्र जाधव यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रदीप दत्तात्रय जाधव वय 35 राहणार रुद्रांश रेसिडेन्सी तामजाई नगर करंजे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप जाधव यांनी युवराज याला घरात लग्नकार्य असल्याने 15 लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची थार जीप वापरण्यास दिलेली होती. परंतु युवराज ने ती गाडी परत दिली नाही व ती परस्पर कोठेतरी विकून टाकली. यासंदर्भात प्रदीप जाधव यांनी वारंवार गाडीची मागणी करूनही युवराजने प्रतिसाद दिला नाही. माझ्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तुझी गाडी देणार नाही. तुला काय करायचे ते कर, परत गाडी मागितली तर पाय मोडून टाकीन, अशी धमकी सुद्धा दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार भोसले करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मंगळसूत्र चोरट्याला नागरिकांनी पकडले
पुढील बातमी
आकले येथे घरफोडी; 25 हजाराचा मुद्देमाल लांबवला

संबंधित बातम्या