सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आरफळ, ता. सातारा येथे मेनवली मयूर भोसले रा. आरफळ, ता. सातारा यांना त्यांच्या घरासमोर जुन्या भांडणाच्या कारणावरून अशोक जमण्या भोसले, भायजान जमण्या भोसले, अजय भायजान भोसले या तिघांनी मारहाण केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.