कास कला व संस्कृती यांच्यावतीने आणि सातारा रंगकर्मी यांच्या सहकार्याने कै . अंजली थोरात एकपात्री अभिनय स्पर्धा २० डिसेंबर रोजी

by Team Satara Today | published on : 10 December 2025


सातारा  :  हौशी कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कास कला व संस्कृती यांच्यावतीने आणि सातारा रंगकर्मी यांच्या सहकार्याने कै. अंजली वामनराव थोरात (थोरात बाई) यांच्या नावाने एकपात्री अभिनय स्पर्धा शनिवारी,  दि. 20 डिसेंबर रोजी आयोजित केली आहे. ऐश्वर्य हॉल, कोल्हटकर आळी, मंगळवार पेठ येथे 2 ते 5 या वेळेत स्पर्धा होईल.  हे या स्पर्धेचे सलग चौथे वर्ष आहे. 

स्पर्धेच्या पहिल्या वर्षाची विजेती सांची भोयर हिने नंतर इंद्रायणी नावाच्या मालिकेत प्रमुख भूमिका केली होती तर सध्या ती एक हिंदी मालिका करता आहे आणि उपविजेता देवदत्त घोणे हा सध्याचा आघाडीचा बाल कलावंत झाला आहे, त्याने अनेक चित्रपट आणि मालिका मधून प्रमुख भूमिका केल्या आहेत.  या स्पर्धेमुळे अनेक कलावंतांना ओळख मिळाली आहे व मिळत आहे. साधारण 50 स्पर्धक दरवर्षी या स्पर्धेला आपली हजेरी लावत असतात.   ही स्पर्धा खुला गट आणि शालेय गट (वय 16 पर्यंत) आशा दोन गटात होईल. यासाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही. 

स्पर्धेतील विजेत्यांना खुल्या गटात अनुक्रमे पाच, तीन आणि दोन हजार आणि शालेय गटात तीन, दोन आणि एक हजार अशी रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी लवकरात लवकर (रविना गोगावले हिच्याशी 9021982889 या क्रमांकावर संपर्क करून) आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन स्पर्धाप्रमुख सचिन मोटे आणि प्रसाद उर्फ राजेश नारकर यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूपुरी परिसरात तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध वृद्धेची ५० हजारांची सोन्याची लूट
पुढील बातमी
दिव्यांगांना समाज प्रतिष्ठा देण्यासाठी प्रयत्न करावा- बंधुत्व प्रतिष्ठानचे अनिल वीर यांचे आवाहन

संबंधित बातम्या