सातारा : जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवार परज येथे जुगार प्रकरणी महंमद मेहबुब खान (वय 65, रा.गुरुवार पेठ, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 500 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.