घरच्या घरी बनवा 'गाजर कलाकंद'

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर गाजर उपलब्ध असतात. गाजरचे नियमित सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. गाजरमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक विटामिन आढळून येतात. नियमित गाजरचे सेवन केल्यास डोळ्यांवरील नको असलेला चष्मा कायमचा निघून जाईल आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात गाजर आल्यानंतर गाजरपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. गाजर हलवा, गाजरची बर्फी, सूप इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमी नेहमी हेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये गाजर कलाकंद बनवू शकता. गाजर कलाकंद बनवणे अतिशय सोपे आहे. चला तर जाणून घेऊया गाजर कलाकंद बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

दूध

गाजर

वेलची पावडर

पिस्त्याचे बारीक तुकडे

बदामाचे बारीक तुकडे

दुधाची पावडर

रॉक शुगर

दही

कृती:

गाजर कलाकंद बनवण्यासाठी सर्वप्रथम, गाजर स्वच्छ पाण्याने धुवून त्यांच्यावरील साल काढून घ्या.

त्यानंतर किसणीच्या सहाय्याने बारीक किसून घ्या. गाजर जास्त जाड किसू नये.

कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. गरम दुधात किसून घेतलेला गाजर टाकून व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवा.

दुसऱ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात दुधाची पावडर टाकून मिक्स करा. नंतर गाजराचे मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर रॉक शुगर , वेलची पावडर, दही टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.

ताटाला तूप लावून घ्या. नंतर त्यात तयार करून घेतलेला कलाकंद टाकून व्यवस्थित सेट होण्यासाठी ठेवा आणि नंतर सुरीच्या साहाय्याने तुकडे करून घ्या.

तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला गाजर कलाकंद. हा पदार्थ तुम्ही सर्व्ह करताना वरून पिस्ता आणि बदामाचे तुकडे टाकू शकता.

मागील बातमी
महाराष्ट्र एसटीमध्ये ‘कर्नाटक पॅटर्न’ अवलंब करण्याचा परिवहन मंत्री यांचा मोठा निर्णय
पुढील बातमी
स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

संबंधित बातम्या