सातारा : म.फुले यांच्या १३४ व्या स्मृतीदिनानिमित्त गोपूज ल,ता. खटाव येथे म.फुलेंचा फोटो आणि सत्यशोधक समाजाचा झेंडा अर्थात,दांडगा धुमाकूळ यांची मिरवणूक काढण्यात आली.
तेव्हाचा गांजलेला, पिचलेला, निकृष्ठ समाज नाकारून महात्मा फुलेंनी सुदृढ समाजाचे स्वप्न पाहिले. त्यांच्या स्वप्नातील समाज म्हणजे सत्यशोधक समाज. या सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी केली. त्या गोष्टीला १५१ वर्षे झाली आहेत. भारतीय समाज जीवनातील ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानिमित्त म. फुले यांची प्रतिमा आणि सत्यशोधक समाजाचा झेंडा यांची मिरवणूक काढून म.फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
गोपूजच्या ग्रामपंचायती समोरून जिजाऊ वंदनेने मिरवणूक सुरू झाली. तेथेच म.फुले यांच्या निवडक पाच अखंडांचे आणि सत्याच्या प्रार्थनेचे जयवंतराव खराडे यांनी गायन केले. विस्मृतीत गेल्यात जमा असलेले आणि म.फुले यांनी उजागर केलेले सर्वांचे प्रेरणादायी महापुरुष कुळवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महामाता जिजाऊ, सावित्रीमाई, अहिल्यामाई आणि म.फुले तसेच विविध सत्यशोधकांचा जयजयकार केला गेला. सगळ्या समाज सुधारणा आणि विकासाचे सगळे प्रवाह महात्मा फुलेंच्या विचार व कार्य यातून सुरू झाल्याचे स्पष्ट केले गेले. विविध सत्यशोधकांचा जयजयकार करण्यापूर्वी त्यांच्या विचार आणि कार्याचा आढावा घेतला जाई. म. फुलेंच्यासाठी मारेकरी म्हणून आलेल्या सत्यशोधक पंडीत धोंडीराम कुंभार यांनी गाण्यातून केलेले तेंव्हाच्या परिस्थितीचे वर्णन ऐकविले गेले. सध्याच्या काळात अतिशय महत्त्वाचे ठरणारे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या शब्दांतील शिवकालीन, "आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान" वर्णन लोकांना फारच भावले. धर्मा धर्मात तेढ वाढवले जात असतांना, " खरा तो एकची धर्म" तर लोकांनी डोक्यावरच घेतले. राजर्षी शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगेबाबा, अण्णाभाऊ साठे, भास्करराव जाधव, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव विचारे अशा महान सत्यशोधकांच्या बरोबरच वीर लहुजी वस्ताद, मुक्ता साळवे, फातिमा शेख, विद्यादेवी सावित्रीबाई रोडे, ताराबाई शिंदे, तानुबाई बिरजे, उस्मान शेख इत्यादि अल्प परिचित सत्य शोधकांचाही जयजयकार केला गेला. ही गोष्ट गावातील विविध घटकांना निश्चितच उभारी देणारी ठरली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील बजरंग घार्गे, सदाशिव खराडे, अधिकराव प्रल्हाद खराडे, महादेव विठ्ठल जाधव, तोसिफ मुलाणी, हणमंतराव पाटील, जयवंतराव खराडे, सदाशिव म्हामणे, अनिकेत डावरे, अमोल मोरे, बाळासाहेब येवले, राजेंद्र गुरव, संजीवनी जाधव, वर्षा पवार आदींनी परीश्रम घेतले. मिरवणुकीमध्ये अनेक जण सामील होते. त्यात गुलाबराव घार्गे, हणमंतराव सुतार, दैवशीला देशमुख, मुमताज मुल्ला, सयाजीराव जाधव, शार्दूल जाधव, समर्थ डावरे, ओम डावरे, किरण माने, दिव्या मदने प्रतिक जाधव वगैरे अनेक जण होते. गोपूज मधील या उपक्रमांची कांहीं खास वैशिष्ट्ये आहेत. या गावांत माळी समाजाचे एकही घर नाही. येथे म. फुले यांचा स्मृतिदिन १९९० पासून दरवर्षी सातत्याने साजरा केला जातो. या वर्षीच्या या उपक्रमात विविध समाज घटकांमधील सत्य शोधकांचा एकत्रित जाहीर जयजयकार हा गोपूजकरांच्या सुसंस्कृत पणाच्या शिरपेचात निश्चितच एक नवीन तुरा आहे.
पूर्ण गावामध्ये अगदी आनंदात, उत्साहात फिरून ग्रामपंचायतीसमोरच मिरवणूक आली. हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल डॉ.दत्ताजीराव जाधव यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन केले. कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि मिरवणूक विसर्जित झाली.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |