सातारा : दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख रुपये अज्ञाताने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील न्यायालयाच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून (एमएच 11 डीके 4243) दीड लाख रुपयांची रक्कम अज्ञाताने चोरी केली. दि. 17 रोजी सकाळी 11 ते 11.30 या दरम्यान ही घटना घडली. या बाबत किरण रघुनाथ शेडगे (वय 47, रा. संभाजीनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार सावंत तपास करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा जिल्हा बँकेत पक्षाचे अस्तित्व दाखवून देणार : शशिकांत शिंदे
October 11, 2026
महिलेच्या विनयभंगाचा आरोप; शाहूपुरी पोलिसांत गुन्हा
October 10, 2026
सातारा औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून 29 हजारांचे साहित्य चोरीला
October 10, 2026