देगाव येथे दारु अड्ड्यावर छापा; एकास अटक, १७ हजारांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 26 April 2026


सातारा  : देगाव येथे कमानीजवळ येथे झाडाझुडपांच्या आडोशाला सुरु असणाऱ्या दारु अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे १७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

किशोर जयवंत माने (वय ३८, रा. देगाव, ता. सातारा) याला याप्रकरणी ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (दि. २५) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. सातारा तालुका पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून पोलिस हवालदार किरण यादव हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अश्वरोहकांचे जलमंदिर पॅलेस येथे जल्लोषात स्वागत; राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार
पुढील बातमी
तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहरातील एकावर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या