म्हसवड : माण तालुक्याच्या पूर्व भागाला तारळी योजनेचे पाणी तातडीने मिळावे, वर्षातून किमान तीन आवर्तने द्यावीत आणि शासनाच्या नियमानुसार ‘टेल टू हेड’ पद्धतीने समान जलवाटप व्हावे, या मागण्यांसाठी आज येथे सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला.
मोर्चाची सुरुवात येथील श्री सिद्धनाथ मंदिरापासून झाली. शिवाजी चौक, बाजारपेठ, रामुस वेस, एसटी बसस्थानकमार्गे मार्गक्रमण करत मोर्चा येथील अतिरिक्त तहसीलदार कार्यालयावर धडकला. या वेळी तारळी सिंचन योजनेचे उपकार्यकारी अभियंता गणेश इंगुळकर आणि चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.