सातारा : एकाच्या दुकानात अनधिकृतपणे प्रवेश करून दुकानातील साहित्य ताब्यात ठेवल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रीतम अनिल गायकवाड (रा. कर्मवीर कॉलनी, सातारा. सध्या रा. भरतगाव, ता. सातारा) यांच्या मल्हार पेठ, सातारा येथील गाळ्यास लावलेले कुलूप तोडून, दुकानात प्रवेश करून त्यांच्या दुकानातील साहित्य ताब्यात ठेवल्याप्रकरणी अफजल अझमखान पठाण राहणार मल्हारपेठ, सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सुडके करीत आहेत.