सातारा : म्हसवे गावच्या हद्दीत महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रकमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश जननारायन सिंग (वय ४५, रा. हरयाणा) हे ट्रकच्या केबिनमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आले. ट्रक मालकाने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्यांचा मृत्यू उपचारापूर्वीच झाल्याचे सांगितले.