सातारा : जाब विचारल्याप्रकरणी अहिरे कॉलनी देगाव रोड संभाजीनगर येथील अश्विन गायकवाड वय 43 या केबल व्यवसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तुषार जाधव राहणार सृष्टी अपार्टमेंट संभाजीनगर व त्याच्या पाच सहा साथीदारांनी मारहाण केल्याने त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक एक ऑक्टोबर सायंकाळी सव्वा सहा वाजता अश्विन गायकवाड यांनी ब्रिझा कारची काच का फोडली, असा जाब विचारल्याच्या रागातून तुषार जाधव आणि त्याच्या पाच सहा मित्रांनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस हवालदार यादव एस. के. अधिक तपास करत आहेत.