सातारा : सातारा शहर पोलिसांनी जुगार प्रकरणी दोन जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी सातारा शहरातील सिव्हिल हॉस्पिटल च्या शेजारी असलेल्या चहाच्या टपरीच्या आडोशास सचिन तानाजी चांगले रा. मंगळवार पेठ, सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 1640 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत, एमआयडीसी मधील कारवाईत अनिल दत्तात्रय खुडे रा. प्रतापसिंह नगर, खेड याच्याकडून 740 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.