सातारा : जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी सातारा शहरातील वाढे फाटा येथील शिवतेज हॉटेल शेजारी असलेल्या शेडच्या आडोशाला श्रीकांत लक्ष्मण पाटील रा. पाटखळ, ता. सातारा हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 710 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.