किल्ले रायरेश्वर कडे जात असताना पर्यटकाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 29 June 2025


सातारा : किल्ले रायरेश्वर (ता. वाई) कडे जाणार्‍या रस्त्यावर वाई पासून सात किमी अंतरावर आसरे (ता वाई) गावच्या हद्दीत, पिंपरी चिंचवड,पुणे येथील एका पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. 

मयूर चंद्रकांत चौधरी (वय 42, सिग्नेचर पार्क, डांगे चौक, पिंपरी चिंचवड, पुणे, असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. याबाबत वाई पोलीस ठाण्यात दीपक दशरथ बर्गे, काळेवाडी, पिंपरी, पुणे, यांनी खबर दिली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे.

मयूर चौधरी मित्रांसोबत पर्यटनासाठी वाईच्या पश्चिम भागात आले होते. तेथून किल्ले रायरेश्वरला जात असताना आसरे (ता वाई) गावच्या हद्दीत मयूर चौधरी यांना छातीमध्ये दुखू लागले व घाम येऊ लागला.

त्यांना तात्काळ उपचाराकरीता वाई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किरण इथापे अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हिंदी सक्तीबाबत राज्य सरकार बॅकफूटवर
पुढील बातमी
सातारा शहर परिसरातून बेपत्ता झालेल्या बालिकेचा अवघ्या 12 तासात शोध

संबंधित बातम्या