सातारा : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रल्हाद शिवाजी पवार रा. गोपाळ वस्ती, अजंठा चौक, सातारा याला 23 मार्च रोजी दोन वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केलेले असताना तो दि. 31 डिसेंबर रोजी अजंठा चौक पुलाखाली असलेल्या आडोशास बसलेला आढळून आला. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.